धुळे–जळगाव महामार्गावर भीषण अपघात

बातमी शेअर करा...

धुळे–जळगाव महामार्गावर भीषण अपघात ; दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

फागणे गावाजवळ ची घटना

धुळे प्रतिनिधी – धुळे–जळगाव महामार्गावर फागणे गावाच्या पुढे गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जळगावातील दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचाही जागीच प्राणांतिक अंत झाला.

मृतांमध्ये दीपक मोतीलाल भामरे (45) आणि पन्नालाल भगवान वर्मा (दोन्ही रा. जळगाव) यांचा समावेश असून, दोघेही एमएच 19 सीई 1719 क्रमांकाच्या दुचाकीने धुळ्याकडून जळगावच्या दिशेने जात होते. फागणे गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला अचानक अपेक्षेच्या विरुद्ध दिलेल्या जबर धडकेत ते दोघेही वाहनासह रस्त्यावर छटकल्याने जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलवले.

या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम