नगरदेवळा एमआयडीसीला गती

बातमी शेअर करा...

नगरदेवळा एमआयडीसीला गती
नागपूर येथे उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या निर्णायक बैठक

भडगाव : नगरदेवळा सुतगिरणीजवळ मंजूर असलेल्या एमआयडीसी प्रकल्पातील मूलभूत कामांना वेग देण्यासाठी १० डिसेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपूर येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उद्योगमंत्र्यांना दिलेल्या पत्राची दखल घेत ही बैठक ठरवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अडीचशे एकरांचा औद्योगिक पट्टा — पुढील टप्पा सुविधांचा

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पाठपुराव्यातून नगरदेवळा येथे अंदाजे २५० एकर क्षेत्रावर एमआयडीसीची मंजुरी मिळाली असून प्लॉटिंगचे काम पूर्ण झाले आहे.
आता उद्योग उभारणीसाठी आवश्यक रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुढील निर्णय या बैठकीत होणार आहे. एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित राहणार असून प्रकल्पाला नवे चलन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर प्रकल्पाला चालना

नगरपरिषद निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचोरात आले असताना सभेतूनच त्यांनी उद्योगमंत्री सामंत यांना फोन करून एमआयडीसीसाठी आवश्यक सुविधा आणि उद्योग आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
या हस्तक्षेपानंतरच प्रकल्पाचा वेग वाढताना दिसत असून नागपूर येथील बैठकही त्याचाच पुढचा टप्पा आहे.

पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, हा माझा ध्यास आहे. नगरदेवळा एमआयडीसीत उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्याची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.”
— किशोरआप्पा पाटील, आमदार (पाचोरा-भडगाव)

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम