
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंदुर्णीत पोलिसांचा रुटमार्च
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंदुर्णीत पोलिसांचा रुटमार्च
शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी शनिवार दि.२९ नोव्हेंबर रोजी आगामी शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी बापु रोहम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा रुटमार्च घेण्यात आला.
शेंदुर्णी दुर क्षेत्र,पहुर दरवाजा, वाडी दरवाजा, दत्त चौक,मुलांनी मस्जिद,होळी मैदान,इस्लामपुरा,कोळी गल्ली, धनगर गल्ली,पारस चौक,मोमीनपुरा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आणि दुर क्षेत्र शेंदुर्णी असा रुटमार्च घेण्यात आला.यावेळी पहुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे शेंदुर्णी दुर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे तसेच पहुर पोलिस स्टेशनचे ४ अधिकारी,२० अंमलदार,SRPF ०७ पोलिस मुख्यालयाकडील दंगा नियंत्रण पथक,३० होमगार्ड आदी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम