
नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमुळे २० व २१ डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद
नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमुळे २० व २१ डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद
जळगाव: राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नगर परिषद/नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता सुरु आहे. आयोगाच्या आदेशान्वये न्यायालयीन अपील व अन्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या प्रभागांतील जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार भुसावळ, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल व वरणगाव येथे दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी भुसावळ, भडगाव, चाळिसगाव, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल, वरणगाव, फैजपूर, रावेर, चोपडा, जामनेर, एरंडोल, पारोळा, धरणगाव, नाशिराबाद या १६ नगर परिषदांमध्ये तसेच मुक्ताईनगर व शेंदुर्णी या २ नगर पंचायतींमध्ये मतमोजणी होणार आहे.
मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडे बाजारामुळे मोठी गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हादंडाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँड फेअर्स अॅक्ट १८६२ चे कलम ५ (अ) व (क) अन्वये प्राप्त अधिकार वापरून दि. २० डिसेंबर २०२५ (मतदान दिवस) व दि. २१ डिसेंबर २०२५ (मतमोजणी दिवस) रोजी नगर पालिका हद्दीतील भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याबाबत निर्देश श्री घुगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम