नदीपात्रात बुडून प्रौढाचा मृत्यू ; वरखेडे येथील घटना

बातमी शेअर करा...

नदीपात्रात बुडून प्रौढाचा मृत्यू ; वरखेडे येथील घटना

चाळीसगाव प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द गावात राहणाऱ्या एका प्रौढाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२० ऑक्टोबर) घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव आण्णा शंकर तीरमली (वय ५८, रा. वरखेडे खुर्द, ता. चाळीसगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास आण्णा तीरमली हे नदीपात्राजवळ गेले असता पाय घसरल्याने ते पाण्यात पडले आणि बुडाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद मेहुणबारे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ मोहन सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम