नवलसिंगराजे पाटील यांनी घेतली पूज्य वासुदेव दास महाराज यांची भेट

बातमी शेअर करा...

नवलसिंगराजे यांनी घेतली पूज्य वासुदेव दास महाराज यांची भेट

जळगाव प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील श्रीराम जन्मभूमी रामकोट परिसरात भेट देऊन पूज्य वासुदेव दास महाराज (रामायणी) यांचे दर्शन घेतले व त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला.
या भेटीदरम्यान धार्मिक वातावरणात झालेल्या चर्चेत श्रीराम जन्मभूमीच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्वावर संवाद साधण्यात आला.

नवलसिंग पाटील यांनी या प्रसंगी अयोध्येतील नव्याने उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या दर्शनाने झालेल्या समाधानाची भावना व्यक्त केली.
यावेळी त्यांच्यासोबत भरत पाटील आणि युवासेना उपतालुका प्रमुख अजयसिंग पाटील (धरणगाव) उपस्थित होते.
भेटीनंतर सर्वांनी श्रीरामाच्या चरणी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. 🙏🏻🤗

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम