नवविज्ञान संशोधन प्रकल्पावर एकदिवसीय कार्यशाळामा संपन्न – सात विद्यापीठांचा सहभाग

बातमी शेअर करा...

नवविज्ञान संशोधन प्रकल्पावर एकदिवसीय कार्यशाळामा संपन्न – सात विद्यापीठांचा सहभाग

जळगाव, (प्रतिनिधी)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र नॉलेज सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सात विद्यापीठांसाठी “मानवविज्ञान विद्याशाखेतील संशोधन प्रकल्प” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज विद्यापीठात उत्साहात पार पडले.

या कार्यशाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, गोंडवाना विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई या सात विद्यापीठांमधील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून गोखले संस्थेचे डॉ. किरण लिमये, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, महाराष्ट्र नॉलेज सेंटरच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. सुचिता कुलकर्णी, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम