
नवापूर पोलिस ठाण्यातील फौजदाराचा अपघाती मृत्यू
नवापूर पोलिस ठाण्यातील फौजदाराचा अपघाती मृत्यू
नवापूर | प्रतिनिधी नवापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले फौजदार जगदीश बाबूलाल सोनवणे (वय ५७, रा. समर्थविहीर, कोकणीहिल, नंदुरबार) यांचा बुधवारी (ता. २४ एप्रिल) रात्री अपघाती मृत्यू झाला. हा अपघात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कळवान गावाजवळ घडला.
पोलिस उपनिरीक्षक सोनवणे हे नवापूरहून नंदुरबारकडे मोटारसायकलने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी सोनवणे यांना तत्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे पोलिस दलात व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम