नवीन ITEP स्वीकारल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल -डॉ.साहेबराव भुकन
केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे एक दिवसीय कार्य शाळेचे आयोजन
नवीन ITEP स्वीकारल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल -डॉ.साहेबराव भुकन
केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे एक दिवसीय कार्य शाळेचे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कार्य शाळेचे आयोजन केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते
तीन सत्रात मध्ये झालेल्या या कार्यशाळेमुळे शिक्षण शास्त्र विभागात नवीन येऊ घातलेल्या ITEP(Integrated Teacher Education Programme) मधील आव्हाने आणि त्यावर उपाय यावर तज्ञांचे विचारमंथन करण्यात आले
सर्वप्रथम विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर दीपप्रज्वल करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना उपप्राचार्य प्रा.डॉ. केतन चौधरी यांनी मांडली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.स.ना. भारंबे होते आपल्या वक्तव्यातून विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून ITEP चे आव्हान महाविद्यालयाने स्वीकारले पाहिजे असे मौलिक मार्गदर्शनकेले.
कार्यक्रमाचे उद्घाटक क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाचे अधिष्ठता साहेबराव भुकन यांनी ITEP स्वीकारल्यामुळे विद्यार्थी गुणवत्ता वाढेल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक राणे होते/.
त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात NCTE/CET/ विद्यापीठ/महाविद्यालय या सर्व संलग्नित संस्थांनी एकत्र येऊन हे आव्हान स्वीकारलं आणि एकत्रित काम केलं तर नक्कीच ITEP इम्प्लिमेंट करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल असे प्रतिपादन राणे यांनी केले.
आलेल्या सर्व प्राचार्यांचे स्वागत महाविद्यालया तर्फे करण्यात आले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मु.जे. महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. भूपेंद्र केसुर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात B.A/B.Com/B.Sc या पारंपारिक महाविद्यालय आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांनी संलग्नित अभ्यासक्रम कसा तयार करावा याचे उपयुक्त मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात मु.जे. महाविद्यालयाचे IQAC कॉर्डिनेटर प्रा.डॉ. केतन नारखेडे यांनी आपल्या संशोधनात्म व्याख्यानात ITEP कितीही कठीण्य असली तरी ती सोप्या पद्धतीत कशी लागू करता येईल हे सांगितले.
तिसऱ्या सत्रात प्रा.डॉ अशोक राणे यांनी सांगितले की राज्य सरकारची सूचना आतापर्यंत आली नाही तरी आपण येणाऱ्या ITEP इम्प्लिमेंट साठी तयार राहावे.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.बी युवाकुमार रेड्डी होते शिक्षणशास्त्र विभाग अतिशय महत्त्वाच्या विभाग असून दर्जेदार शिक्षणासाठी व दर्जेदार शिक्षकांसाठी NEP ने ITEP इम्प्लिमेंट करणे आवश्यक केली आहे.
सदर कार्यक्रमाला सूत्रसंचालन प्रा.डॉ.स्वाती चव्हाण,प्रा.डॉ. वंदना चौधरी ,प्रा.डॉ. कुंदा बाविस्कर यांनी केले तर आभार प्रा.डॉ. पुनम जमदाडे व प्रा.डॉ. डॉक्टर गणेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम