नवीन बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

बातमी शेअर करा...

नवीन बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

 

जळगाव : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात १९ मे २०२५ रोजी दुपारी एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी त्या दिवशी दुपारी बसस्थानक परिसरात आली होती. तिच्या कुटुंबीयांच्या कायदेशीर देखरेखीत असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम