
नवीन बी.जे. मार्केट परिसरात मध्यरात्री दुकानफोडीचा प्रयत्न; एका संशयित ताब्यात
नवीन बी.जे. मार्केट परिसरात मध्यरात्री दुकानफोडीचा प्रयत्न; एका संशयित ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नवीन बी.जे. मार्केट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शहरातील अयोध्या नगरात राहणारे सुनिल कोल्हे (वय ३५) यांचे गायत्री कॉस्मेटिक नावाचे दुकान नवीन बी.जे. मार्केट परिसरात आहे. दि. १२ रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या भावाने, मंदार कोल्हे यांनी, फोनवरून माहिती दिली की दुकानाच्या शटरचे कुलूप कोणी तरी तोडण्याचा प्रयत्न केला आहे.
सुनिल कोल्हे तात्काळ दुकानावर पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता, दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा आणि कुलूप तुटलेले आढळून आले. मात्र दुकानातील कोणतीही वस्तू चोरीस गेलेली नव्हती. त्यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ मिलिंद सोनवणे करीत आहेत. पोलिसांनी एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम