
नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा सत्र संपन्न
रावेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणावर जिल्ह्यातील संस्था चालक व मुख्याध्यापकांसाठी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव खुर्द येथे चर्चा सत्र संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड होते. प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रा. डॉ अनिल झोपे व शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ए. आर. राणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची सविस्तर माहिती तसेच महत्त्वाचे व ठळक मुद्द्यांवर पीपीटी च्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षकांना दिली. डीजिटल पायाभूत सुविधा या नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी संस्था व शाळांना उभाराव्या लागणार आहेत. आपल्या आवडीच्या विषयानुसार शिक्षण घेण्याची सुविधा या धोरणातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था चालक संघटनेच्या कार्याध्यक्षा रोहिणी खेवलकर खडसे यांनी केले. याप्रसंगी सुरेश अहिरे, सुकदेव गिते, नुरजहॉं खान यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर अश्वीनी कोळी यांना राज्यस्तरीय बाल रक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ वैभव पाटील, डॉ केतकी पाटील, प्रा .सी.डी.साळुंखे, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष जे.के.पाटील, रजिस्टार प्रमोद भिरुड, प्रा. डॉ विजय पाटील, आय.एम.आर. चे संचालक डॉ. प्रशांत वारके, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष जयवंत पाटील, कार्याध्यक्षा रोहिणी खेवलकर खडसे, सरचिटणीस संजय सोमाणी, चिटणीस शकील पटेल, उपकार्याध्यक्ष महेंद्र मांडे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य तसेचजिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सेक्रेटरी बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष एस्.एस्.पाटील, साधना लोखंडे, ललित चौधरी, सह सेक्रेटरी डी. बी. बोरसे, आर.ए.पाटील व सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून सुमारे ७०० मुख्याध्यापक व संस्था चालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शैलेश राणे यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम