
नशा करण्यास पैसे न देणाऱ्या पत्नीवर पतीने केला कोयत्याने हल्ला
जळगाव शहरातील राजीव गांधी नगरातील घटना
नशा करण्यास पैसे न देणाऱ्या पत्नीवर पतीने केला कोयत्याने हल्ला
जळगाव शहरातील राजीव गांधी नगरातील घटना
जळगाव : नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ११ रोजी दीड वाजेच्या सुमारास राजीव गांधी नगरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राजीव गांधी नगरात संगिता रमेश झेंडे (वय ५०) हे वास्तव्यास आहे. दि. ११ रोजी दुपारच्या सुमारास संगिता झेंडे यांचे पती रमेश बाबासाहेब झेंडे यांनी नशा करण्यासाठी पैसे मागितले. परंतु पत्नीने पैसे न दिल्याचा राग आल्याने रमेश झेंडे यांनी लाकडी दांडक्यासह धारदार कोयत्याने पत्नीवर वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, संगिता झेंडे यांनी पतीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती रमेश झेंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम