
नशिराबादमध्ये भीषण आग
तीन लाखांचे नुकसान
जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथे भीषण आग लागून तीन लाखाचे बांधकाम साहित्य आणि लाकडी पाट्या जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली. वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
नशिराबाद येथील रहिवासी सुधाकर नांदुरकर यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत तीन लाख रुपये किमतीच्या बांधकामाच्या पाट्या आणि लाकडं जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तसेच नागरिकांनी तातडीने प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा आगीने रौद्ररूप धारण केले असते तर शेजारच्या घरांनाही धोका निर्माण झाला असता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम