नशिराबाद जिल्हा परिषद उर्दू शाळा, कन्या शाळा क्र. २ मध्ये चोरी

बातमी शेअर करा...

नशिराबाद जिल्हा परिषद उर्दू शाळा, कन्या शाळा क्र. २ मध्ये चोरी

पोषण आहारातील अन्नधान्य, तेल लंपास

नशिराबाद ता. जळगाव गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळा व कन्या शाळा क्र. २ येथे चोरीची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार रविवारी दि. ५ रोजी रात्री घडला असून शाळा सोमवारी उघडल्यावर चोरी झाल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शाळेतील काही वर्गखोल्यांची कुलपे फोडली असून मोठ्या दगडांचा वापर करून दरवाजे उघडण्यात आल्याचे दिसून आले आहे. शालेय पोषण आहारासाठी

साठवलेले अन्नधान्य व तेल चोरीला गेले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सोमवारी सकाळी शाळेतील कर्मचारी व शिक्षकांनी शाळा उघडत असताना हा प्रकार उघड झाला. शाळेचे मुख्याध्यापक यांनी या घटनेबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शाळेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम