
नशिराबाद परिसरातून मालवाहू वाहन चोरीला
नशिराबाद परिसरातून मालवाहू वाहन चोरीला
जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद येथील सुनसगाव रोडलगत स्वतःच्या प्लॉटमध्ये उभे केलेले मालवाहू वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत प्रकाश बोंडे (वय ३२, रा. नशिराबाद) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या मालकीचे मालवाहू वाहन (क्र. एमएच १९ बीजे १९५९) प्लॉटमध्ये उभे केलेले असताना रात्रीच्या सुमारास चोरट्याने ते लंपास केले. वाहन चोरीची बाब लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
नशिराबाद पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक फौजदार राजेश मेढे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम