
नागपूर पोलिसांच्या कोठडीतून पळालेला आरोपी चाळीसगावात पकडला
नागपूर पोलिसांच्या कोठडीतून पळालेला आरोपी चाळीसगावात पकडला
चाळीसगाव: नागपूर शहरातील हिंगणा पोलीस स्टेशनमधून पळून गेलेल्या एका फरार आरोपीला चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. हा आरोपी ३० ऑगस्ट रोजी नागपूर पोलिसांच्या कोठडीतून वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पळून गेला होता.
हिंगणा पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यातील आरोपी गणेश भिकन गोसावी (वय २०, रा. विखरण, ता. एरंडोल) हा पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. यानंतर नागपूर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हा आरोपी डोण, ता. चाळीसगाव येथील त्याच्या मावस भावाकडे लपून बसला होता.
माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि त्याला नागपूर शहर येथील हिंगणा पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत आणि इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम