नागरिकांवर आली नाला साफ करण्याची वेळ

चिनावल येथील प्रकार

बातमी शेअर करा...

नागरिकांवर आली नाला साफ करण्याची वेळ
चिनावल येथील प्रकार
सावदा I प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसापासून चिनावल येथे वाघोदा रोडवरील नाला ,कुंभारखेडा रोडवरील मशीद समोरील नाला जुने हरिजन वस्ती मागील नाला या नाल्यांची सफाई न झाल्याने शासलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा अटकून डास तसेच सर्प व जलचर प्राण्यांनी उच्छाद मांडल्याने अखेर ग्रामस्थांनी हे नाले साफ करणे सुरू केले आहे .

अनेक दिवसापासून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बाटल्या पिशव्या वेगवेगळ्या प्रकारचे कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्याने गावात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच गावांतर्गत गटारीतही घाण राहत असल्याने डास सर्प यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी स्वतःच या नाल्यातील घाण काढणे सुरू केले आहे.

संबंधितांनी गावाच्या तिन्ही बाजूचे नाले तसेच गावातील अंतर्गत गटारी व जागोजागी पडणारा कचरा दररोज उचलून साफसफाई करावी अन्यथा गावात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम