नाचनखेडा येथील रामतीर बाबा यात्रोत्सवात भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांची उपस्थिती

बातमी शेअर करा...

नाचनखेडा येथील रामतीर बाबा यात्रोत्सवात भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांची उपस्थिती

 

नाचनखेडा: श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात सुरू असलेल्या नाचनखेडा येथील रामतीर बाबा यात्रा उत्सवाला भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी नुकतीच भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे यात्रेतील उत्साहात आणखी भर पडली.

यावेळी, ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात वैशालीताई सूर्यवंशी यांचे जोरदार स्वागत केले. तसेच, ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहारांनी सत्कार करण्यात आला. वैशालीताई सूर्यवंशी यांनी रामतीर बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

या प्रसंगी हिंमत आण्णा, करण नाना, धर्मेंद्र निकुंभ, गौतम घोडेस्वार, गुलाब निकुंभ, दीपक महाले, विठ्ठल निकुंभ यांच्यासह अनेक ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम