नाडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा...

नाडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

बोदवड – तालुक्यातील नाडगाव येथील कर्जबाजारी शेतकरी मिलिंद जगन्नाथ धांडे (वय ३४) यांनी बुधवारी, दि. २० रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. वाढत्या कर्जबोजा आणि परतफेडीच्या चिंतेने ग्रस्त झालेल्या या तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद धांडे हे आपल्या वडील जगन्नाथ विठ्ठल धांडे यांच्या नावावर असलेली शेती कसून उदरनिर्वाह करीत होते. मात्र, सततच्या तोट्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. गट क्रमांक ५८/२ सोनोटी व गट क्रमांक ७८/२ या शेतीवर घेतलेले सुमारे ६ लाख ५० हजार रुपये कर्ज तसेच कृषी केंद्रावर खरेदी केलेल्या खत-बियाण्यांचे २ लाख रुपये असे मिळून एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर होते.

कर्जाची परतफेड कशी करावी, वाढत्या व्याजाचा ताण कसा सांभाळावा या नैराश्यातून अखेर त्यांनी जीवन संपविण्याचा मार्ग स्वीकारला, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली.

धांडे यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील तसेच अविवाहित भाऊ असा परिवार आहे. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाची नोंद बोदवड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल युनूस तडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम