
नातवाने केलेल्या कुऱ्हाडीच्या हल्ल्यातील आजीचा उपचारादरम्यान मृत्यू
नातवाने केलेल्या कुऱ्हाडीच्या हल्ल्यातील आजीचा उपचारादरम्यान मृत्यू
धरणगाव | प्रतिनिधी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आजीवर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना धरणगाव येथे घडली होती. उपचारादरम्यान जखमी लिलाबाई रघूनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ, जळगाव) यांचे पुण्यात दि. ८ जुलै रोजी दुपारी निधन झाले. या प्रकरणातील गुन्ह्यात आता खुनाचा कलम वाढविण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिलाबाई विसपुते या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेल्या नातवाला वारंवार समज देत होत्या. त्यामुळे दोघांमध्ये आधीही वाद झाले होते. २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजता पुन्हा वाद झाल्यानंतर, तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) याने बेडरूममध्ये झोपलेल्या लिलाबाईंवर कुऱ्हाडीने हल्ला केला होता.
घटनेनंतर तेजसने सुरुवातीला आजीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आणि तेजसला अटक करण्यात आली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम