नातीच्या लग्नासाठी जपलेला ऐवज चोरट्यांनी लुटला; वृद्ध आजींच्या कष्टावर पाणी

बातमी शेअर करा...

नातीच्या लग्नासाठी जपलेला ऐवज चोरट्यांनी लुटला; वृद्ध आजींच्या कष्टावर पाणी

जळगाव प्रतिनिधी – नातीच्या लग्नासाठी कष्टाने जमवलेली रोकड आणि दागिने चोरट्यांनी लंपास करत वृद्ध आजींच्या आनंदावर पाणी फेरल्याची मन हेलावून टाकणारी घटना तालुक्यातील नारायण नगर परिसरात २५ ते २६ नोव्हेंबरच्या दरम्यान घडली. सुमन दयाराम सपकाळे (वय ७०) आपल्या मुलगा, सून आणि नातवंडांसह वास्तव्यास आहेत. मुलगा जितेंद्र सपकाळे हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सुमन सपकाळे यांनी दीर्घकाळ बचत करून ६० हजारांची रोकड, सोन्याचे काही दागिने आणि मुलांसाठी चांदीचे कडे जपून ठेवले होते.

याच हट्टाची माहिती मिळाल्याप्रमाणे रात्रीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. लोखंडी पेटीत ठेवलेली ६० हजारांची रोकड, १ ग्रॅम वजनाचे तीन जोड कानातले, २ ग्रॅमचे मनी मंगळसूत्र आणि १० भार वजनाचे मुलांच्या हातातील चांदीचे कडे असा एकूण ९२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला.

पहाटे घर अस्ताव्यस्त दिसताच चोरी उघडकीस आली. त्यानंतर सपकाळे कुटुंबीयांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना विजय निकम करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम