नाथ फाउंडेशनतर्फे  जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मातांना साडी व नवजात बालकांना ड्रेस देऊन सन्मान

बातमी शेअर करा...

नाथ फाउंडेशनतर्फे  जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मातांना साडी व नवजात बालकांना ड्रेस देऊन सन्मान

जळगाव प्रतिनिधी

 

जागतिक महिला दिनानिमित्त नाथ फाउंडेशनच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महिलादिनी जन्मलेल्या मुलींच्या मातांना साडी आणि नवजात बालिकांना ड्रेस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि नर्स यांनाही फुलांचे गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी होते. त्यांच्यासह राष्ट्रवादी युवक महानगर अध्यक्ष रिकू चौधरी, अल्पसंख्यक महानगर अध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, ओबीसी सेल महानगर अध्यक्ष नामदेवभाऊ वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, सौ. सुमन बनसोडे, सौ. भारती लाडवंजारी, राष्ट्रवादी महिला आघाडी महानगर सरचिटणीस सौ. वर्षा राजपूत, महानगर सरचिटणीस रहिमभाऊ तडवी, राहूल टोके, योगेश लाडवंजारी आणि वंशीका राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि त्यांच्या योगदानाबद्दल विचार मांडले. नाथ फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे महिलादिनी एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम