
नामदार गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
नामदार गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
मोदी-फडणवीस सरकारच्या योजनांनी उजळला विकासाचा दीप!
जळगाव प्रतिनिधी
राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी यंदा दिवाळीचा उत्सव एक वेगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केला. त्यांनी यावल तालुक्यातील बारी पाडा या दुर्गम आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील बांधवांसोबत दिवाळीचा आनंद वाटला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
या भेटीदरम्यान गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांच्या घरात जाऊन त्यांच्या हातची पारंपरिक ठेचा-भाकर चा अस्सल स्वाद घेतला.
ग्रामीण चुलीवर शिजवलेली भाकर आणि ठेचा खाताना त्यांनी आदिवासी संस्कृतीशी एकरूप होऊन “ही खरी आपुलकीची दिवाळी आहे” असे मनापासून म्हटले. या दृश्याने संपूर्ण वस्ती आनंदात न्हाऊन निघाली.
या भेटीत गिरीशभाऊंनी सांगितले
> “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा किरण पोहोचवत आहे. दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे प्रत्येक घरात प्रकाश पोहोचवणे — आणि आम्ही तेच करत आहोत.”
या निमित्ताने गिरीशभाऊंनी प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, तसेच राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषि योजना, जलयुक्त शिवार अभियान आणि गृहनिर्माण व सामाजिक कल्याण योजना यांचा उल्लेख करत सांगितले की या योजनांमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात विकासाची गंगा वाहू लागली आहे.
या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी ‘गिरीशभाऊ आमच्या सारख्या दुर्गम भागात येऊन आम्हाला दिवाळीचा खरा आनंद दिला, आमच्यासोबत बसून जेवले, हा क्षण आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू!’ असे सांगत भावनिक कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमावेळी आमदार अमोल जावळे, माजी नगराध्यक्षा सौ. साधना ताई महाजन, आमदार अमोल जावळे केतकी पाटील नंदू महाजन डॉक्टर फेगडे हिरालाल चौधरी विलास चौधरी अरविंद देशमुख उमेश फेगडे सागर कोळी अतुल भालेराव रवींद्र सूर्यभान पाटील उज्जैन सिंग राजपूत तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी बारी पाडा आणि लगतच्या गावांना दत्तक घेतल्याची घोषणा केली तसेच या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने राबवण्याचे आश्वासन दिले.
या संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे नामदार गिरीशभाऊ महाजन यांचे कार्य हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून जनसेवा, आत्मीयता आणि संवेदनशीलतेचे प्रतीक ठरले आहे. त्यांनी आदिवासी समाजासोबत साजरी केलेली ही दिवाळी खर्या अर्थाने “विकास आणि मानवतेचा उत्सव” ठरली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम