नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून विलास बोडके यांची नियुक्ती

बातमी शेअर करा...

नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून विलास बोडके यांची नियुक्ती

नाशिक प्रतिनिधी नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून विलास बोडके यांची नियुक्ती झाली आहे. तर नाशिकच्या मखमलाबाद येथील मनिषा पिंगळे या आता नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारतील. बोडके हे सोमवारी (दि.२५) पदभार स्वीकारणार आहेत.

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके हे सध्या धुळे येथे कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांनी जळगाव, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तसेच मालेगाव, नाशिक, पुणे, मुंबईतील मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागात विविध पदांवर सेवा बजावली आहे.

नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी पद एक वर्षापासून रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पद्भार गोपाळ साळुंखे यांच्याकडे होता. मनिषा पिंगळे या मुळच्या नाशिककर असून सध्या त्या रायगड येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांच्याकडे नवी दिल्लीतील महत्वाची जबाबदारी आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम