नासिर खान यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सन्मान

बातमी शेअर करा...

नासिर खान यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सन्मान

जळगाव :इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू हायस्कूल, तोंडापूर येथील ज्येष्ठ शिक्षक नासिर खान सफदर खान यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सन्मान” प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला रवींद्र भैय्या पाटील, प्रा. डॉ. दिलीपकुमार ललवानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शालिग्राम मालकर तसेच डॉ. मुनाफ शेख (उपकुलसचिव, परीक्षा विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) उपस्थित होते. खान यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

नासिर खान हे विद्यार्थीप्रिय शिक्षक असून समाजकार्यकर्ते देखील आहेत. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी त्यांना समाजात स्थिरस्थावर होण्यास हातभार लावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, डॉ. इक्बाल शहा, एजाज मलिक, तारीख शेख, मुख्याध्यापक अय्युब शेख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

या वेळी त्यांचे मोठे बंधू अफजल खान, मुख्तार खान पठाण, प्रा. डॉ. चांद खान, फैसल खान व ताह खान उपस्थित होते. हा सन्मान मिळाल्याने जळगाव जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम