
ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रावेर – पुनखेडा – पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन संपन्न
रावेर (प्रतिनिधी)
ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर – पुनखेडा – पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज महंत राजगिरी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास भाजपचे विविध पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून हा रस्ता तयार केला जाणार असून, आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे रावेर ते पातोंडी व पुनखेडा या भागांचा संपर्क अधिक चांगल्या प्रकारे प्रस्थापित होणार असून, मुक्ताईनगर – रावेर दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होईल.
आजपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांचे आभार मानले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
भाजप प्रदेश सदस्य: सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष: पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, माऊली फाउंडेशन अध्यक्ष: डॉ. संदीप पाटील, माझी पस सदस्य पि.के.महाजन, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख: उमाकांत महाजन, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस: संदीप सावळे, भाजप तालुकाध्यक्ष: दुर्गेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष: महेश चौधरी, पुनखेडा सरपंच: सौ. कीर्तीताई पाटील, पातोंडी सरपंच: सौ. नम्रताताई कोळी, तसेच राजन लासूरकर, विजय महाजन, संजय महाजन, तालुका अध्यक्ष रविंद्र पाटील, सूर्यकांत देशमुख, तालुका उपाध्यक्ष साजन चौधरी, बाळा आमोदकर, उद्देश कचरे, वासुदेव नरवाडे, पवन चौधरी, निलेश सावळे, अरुण शिंदे, नितीन पाटील, समाधान पाटील, यशवंत आप्पा, रमेश सावळे, लक्ष्मण सावळे, राजेंद्र पाचपोहे, डिगंबर बोरसे, आशा सपकाळे, नंदनीताई पंत, आशा मोरे, अजाबराव पाटील, उमेश वरणकर, उमेश कोळी, मनोहर सावळे, चेतन जैन, सुरेश चौधरी, पंडित सर, श्रीराम कोळी, मनोज पाटील, गणेश बोरसे, लखन महाजन, मोहन बोरसे, योगेश महाजन, पवन पाटील, पंडित पाचपोळ, तसेच रस्त्याचे ठेकेदार चिंतन जैन यांची उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम