निंबाच्या झाडावर कार आदळली; चार जखमी, एक जण गंभीर

बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील चिंचोली गावाजवळ घडली घटना

बातमी शेअर करा...

निंबाच्या झाडावर कार आदळली; चार जखमी, एक जण गंभीर

बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील चिंचोली गावाजवळ घडली घटना

यावल | बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील चिंचोली गावाजवळ शनिवारी (२७ एप्रिल) रात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. गुजरातहून भुसावळकडे लग्न समारंभासाठी निघालेल्या व्यक्तींची हुंडाई कार (क्र. GJ-05-JE-8071) चिंचोली-धानोरा मार्गावर रस्त्यात कोसळलेल्या मोठ्या निंबाच्या झाडावर धडकली.

या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले, तर चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमी गुजरातमधील रहिवासी असून, त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महामार्गालगत असलेले मोठे, जिवंत झाड अचानक कोसळणे संशयास्पद मानले जात आहे. स्थानिक नागरिक आणि वृक्षप्रेमींनी परिसरात अवैध लाकूडतोड होत असल्याची शंका व्यक्त केली आहे.

स्थानिकांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली असून, संबंधित विभागाने महामार्गालगतच्या झाडांची तातडीने तपासणी करावी, असे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम