निंभोरा गावात वाहन पलटी होऊन चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा...

निंभोरा गावात वाहन पलटी होऊन चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावात बुधवारी (२१ मे) सकाळी १० वाजता वाहन पलटी झाल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोशी विजय बशीरे (वय ४, रा. निंभोरा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोशी ही चिमुकली आपल्या कुटुंबासह निंभोरा गावात राहत होती. सकाळच्या सुमारास अचानक चारचाकी वाहन पलटी झाल्याने गंभीर अपघात घडला. या अपघातात आरोशी जखमी झाली. तिला तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या अपघातानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. दरम्यान, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार संदीप बडगे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम