निंभोरा येथील स्टेशन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाक्षणिक उपोषणाचा इशारा

बातमी शेअर करा...

निंभोरा येथील स्टेशन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाक्षणिक उपोषणाचा इशारा
सावदा -निंभोरा बस स्टँड ते स्टेशन दरम्यान असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याच्या पर्यायी रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दिनांक ०६सप्टेंबर पर्यंत पर्यायी रस्ता दुरुस्ती न झाल्यास दि.०८ रोजी त्या रस्त्यातच लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा इशारा सुनिल कोंडे यांनी दिला.या संदर्भात त्यांनी सावदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात या संबंधीचे निवेदन दिले.त्यात या रस्त्यामुळे स्टेशन रस्त्यातील अनेक रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर अनेकदा लहान मोठे अपघात ही या खड्ड्यांमुळे होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असल्याने शेवटी ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला. दरम्यान याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता लवकरच या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत ठेकेदारास सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम