
निंभोरा येथे शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला
निंभोरा येथे शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला
बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी
भडगाव :प्रतिनिधी
एका शेतामध्ये हा बिबट्या मृतावस्थेत तालुक्यातील निंभोरा येथे शेतशिवारात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. दिलीप बाविस्कर या शेतकऱ्याच्या शेतात मका पिकाला पाणी टाकत असतांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. मुलाणे, वनपाल नंदू पाटील, नाकेदार मुकेश बोरसे, वनरक्षक दुर्गादास वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
दिलीप बाविस्कर यांच्या शेतातील मक्याच्या शेतात दुर्गंधी येत असल्याने त्याची पाहणी करीत असताना बिबट्या मृतावस्थेत दिसून आला.या[रसंगी उपसरपंच विश्वास पाटील, ग्रा. पं. सदस्य रविंद्र पाटील, सदस्य छोटू बाविस्कर, पोलिस पाटील शरद पाटील तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम