
निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद
निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद
एम. जे. कॉलेज, सोहम योग विभाग आणि धात्री आयुर्वेद क्लिनिकचा संयुक्त उपक्रम
जळगाव -एम. जे. कॉलेज सोहम योग विभार व धात्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी आयोजित निःशुल्क शुगर, बी.पी. व कराडा स्कॅन तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.
दुपारी ३ ते ६ या वेळेत शिबिराला शहरातील विविध वयोगटातील नागरिकांनी, केसीई सोसायटी येथील सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला. शिबिरासाठी ७७ सहभागी तपासणीसाठी उपस्थित होते .
प्रत्येक नागरिकाची नोंदणी करून त्यांचे बीपी, मधुमेह चाचणी, कराडा स्कॅनमधून शरीरातील फॅट चे प्रमाण, वजन, जलांश, BMR, इत्यादी तपासून वैयक्तिक अहवाल दिला गेला. तपासणीनंतर प्रत्येक सहभागीला वैयक्तिक आरोग्यस्थितीनुसार योग थेरपी, प्राणायाम पद्धती, जीवनशैली सुधारणा, तसेच आहार पद्धती, ऋतुनुसार दिनचर्या, स्ट्रेस मॅनेजमेंट, मधुमेह व बी.पी. नियंत्रणासाठी योगक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. गणेश पाटील आणि डॉ. हर्षदा पाटील यांनी तपासणी करून दोषानुसार आहार, पचनशक्ती वाढविण्याचे उपाय, आणि औषधी वनस्पतींचा उपयोग यावर माहिती दिली. तपासणी अहवाल हातात मिळताच तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे सहभागी समाधानी दिसून आले. समाजामध्ये जीवनशैली विकारांची वाढती समस्या लक्षात घेता नियमित आरोग्यपरीक्षणाचे महत्त्व सांगणे व योग–आयुर्वेदाच्या माध्यमातून नैसर्गिक आणि औषध-मुक्त मार्गाने आरोग्यसुधारणा घडवणे हा शिबिराचा मुख्य हेतू होता. एम. जे. कॉलेजचे प्राचार्य संजय ना. भारंबे, सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार, प्रा. पंकज खाजबागे, डॉ.ज्योती वाघ, डॉ.श्रद्धा व्यास आणि धात्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक मधील सहकारी, आणि सोहम योग विभागातील विद्यार्थ्यांच्या मदतीने तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम