
निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न
निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम
जळगाव- आज सर्वसामान्य लोकांना विविध व्याधी त्रासदायक ठरत आहे. या व्याधींसाठी आपण विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती आणि औषधींचे सेवन करत असतो. त्याचे साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्याला अनेक आजारांना बळी पडावे लागते. यातून बाहेर पडण्यासाठीच आपल्या भारतीय चिकित्सापद्धती योग निसर्गोपचार आयुर्वेद उपलब्ध असतानाही अयोग्य दिनाचार्य आणि दिनचर्येअभावी आपण व्याधीग्रस्त होतो. या व्याधींमधून बाहेर पडण्यासाठी ॲक्युप्रेशर हा एक महत्त्वाचा उपाय असू शकतो. आपले आरोग्य आपल्या हात आणि पायाच्या दाबबिंदूंवर दाब देऊन आपण कसे सुदृढ राहू शकतो विविध व्याधींपासून कशी मुक्तता मिळवू शकतो हे समजून घेण्याच्या उद्देशाने ॲक्युप्रेशर चिकित्सक डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम योग विभागामध्ये ॲक्युप्रेशर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ही कार्यशाळा आनंदयात्री योग हॉल, सोहम योग विभाग एम. जे. कॉलेज येथे बुधवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 3 ते 4:30 या वेळेत आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रमुख अतिथी म्हणून कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. पराग कुलकर्णी उपस्थित होते त्याचबरोबर केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालक तथा सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रा शमा सुबोध सराफ, सोहम योग चे संचालक डॉ. देवानंद सोनार आदी उपस्थीत होते.
कार्यशाळेमध्ये ॲक्युप्रेशर या उपचार पद्धतीचा इतिहास त्याची आधुनिक युगातील गरज आणि विविध आजारांवर ॲक्युप्रेशर चा कसा उपयोग करून घेता येतो, याविषयीचे विस्तृत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित असलेल्यांपैकी काही रुग्णांवर एक्यूप्रेशर पद्धतीने उपचार करण्यात आले.
द्वितीय सत्रामध्ये दुपारी तीन वाजता प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पराग कुलकर्णी यांचे सोबतच डॉ. मृणालिनी फडणवीस, मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य संजय ना. भारंबे, केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. शशिकांतजी वडोदकर हे उपस्थित होते.
कार्यशाळेप्रसंगी केसीई सोसायटीच्या सर्व शाखांचे प्राचार्य आणि प्रमुख उपस्थीत होते. ४०० प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
ॲक्युप्रेशर कार्यशाळेला लाभलेला उदंड प्रतिसाद बघता लवकरच सोहम योग विभागाच्या वतीने सात दिवसीय ॲक्युप्रेशर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल त्यात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा व्यास यांनी आणि आभार डॉ. देवानंद सोनार यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. शमा सराफ, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. ज्योती वाघ, प्रा. श्रद्धा व्यास, श्री. संदीप केदार, श्री. संजय जुमनाखे यांनी अथक परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम