
निधन वार्ता : आमदार किशोरआप्पा पाटील यांना मातृशोक
निधन वार्ता : आमदार किशोरआप्पा पाटील यांना मातृशोक
पाचोरा प्रतिनिधी
पाचोराविधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मातोश्री गं.भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील (वय-९२) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे ४.५५ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथून दुपारी ३ वाजता निघणार असून अंत्यविधी पाचोरा स्मशानभूमी येथे होईल. नर्मदाबाई यांच्या पश्चात आमदार किशोरआप्पा पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, विजय मेघराज पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम