निमगव्हाणला १८ ऑक्टोबर रोजी स्वामी भक्तानंदजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

बातमी शेअर करा...

निमगव्हाणला १८ ऑक्टोबर रोजी स्वामी भक्तानंदजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

चोपडा- श्री. दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान, निमगव्हाण (ता. चोपडा) यांच्या वतीने प.पू. श्री. स्वामी भक्तानंदजी गुरु रेवानंदजी परमहंस महाराज यांची ४४ वी पुण्यतिथी सोहळा आश्विन कृ. १३ धनत्रयोदशीदिनी दि. १८ (शनिवार) रोजी तिर्थक्षेत्र श्री. दादाजी दरबार, निमगव्हाण येथे सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

स्वामी भक्तानंदजी महाराज यांनी श्री. बडे दादाजी महप्ताज (श्री. केशवानंदजी महाराज) खंडवा (म.प्र) यांच्या आज्ञेनुसार खान्देशात सत्य सतयुग प्रचार करून गावोगावात श्री. दादाजी नामाचा सोबत सत्य सतयुगाचा प्रसार व प्रचार केला आहे. स्वामीजींनी दादाजी नामाचा तप करत ५ फूट ५ इंच लांबीची दाढीची जटा तयार केली होती,

पुढे १९७९ साली नाशिकच्या कुंभमेळामध्ये संपूर्ण देशभरातून आलेल्या साधुसंतांमध्ये सर्वाधिक लांब दाढीची जटा असलेले तपस्वी साधू म्हणून त्यांना घोषित करण्यात आले होते. त्यांनी सत्य हो प्यारे राम राज्य की सत्ता हो !! असे जयघोष दिले. स्वामीजींनी सन १९४८ साली निमगव्हाण दरबारची उभारणी केली व येथे अखंड घुणी चेतन केली, जी आजदेखील चालू आहे. अशी महान आख्यायिका स्वामीजींची आहे, याच विचारांना व भक्ती भावाने प्रेरीत होऊन देशभरात विविध भाविक भक्त स्वामीजींचे अनुयायी आहेत. स्वामी भक्तानंदजींनी आश्चिन कृ. १३ धनतेरसदिनी दि. २५ ऑक्टोंबर १९८१ रविवार रोजी निमगव्हाण येथे संजीवन समाधी घेतली, तेव्हा पासून त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षी देखील १८ ऑक्टोंबर रोजी विविध कार्यक्रम पार पडतील यात, सकाळी ६ वाजता पुज्य स्वामीजीच्या समाधीचा महाअभिषेक करण्यात येईल, त्यानंतर सकाळी ८ वाजता गावात निशाण व कळस मिरवणूक निघेल, दुपारी १२ वाजता महाआरती होईल व महाप्रसादास सुरुवात होईल व रात्री ८ वाजता मशाल परिक्रमा निघेल. सदर सोहळ्यास महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथील हजारों भक्तगण येतात. तरी या शुभप्रसंगी परिसरासह तालुक्यातील भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभघ्यावा असे आवाहन श्री. दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान व निमगव्हाण ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम