
निमगव्हाण-वैजापूर रस्त्याचे २१० कोटींच्या निधीतून काँक्रीटीकरण ; काम युद्धपातळीवर सुरू !
माजी आमदार सौ. लताताई सोनवणे व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश
निमगव्हाण-वैजापूर रस्त्याचे २१० कोटींच्या निधीतून काँक्रीटीकरण ; काम युद्धपातळीवर सुरू !
माजी आमदार सौ. लताताई सोनवणे व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश
चोपडा (प्रतिनिधी
चोपडा विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण निमगव्हाण-वैजापूर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, २१० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. या कामासाठी माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून तसेच आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा रस्ता प्रत्यक्षात आकार घेत आहे.
प्रगत तंत्रज्ञान व दर्जेदार कामगिरी
या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि कुशल कामगारांची फौज तैनात असून, रस्त्याच्या मजबुतीसाठी माती परीक्षणासह भूसंपादनाचे उच्च दर्जाचे नियोजन केले जात आहे. मातीच्या सखोल स्तरांपर्यंत उत्खनन करून कामाच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जात आहे, ज्यामुळे हा रस्ता जनतेच्या अपेक्षांप्रमाणे सक्षम आणि मजबूत होणार आहे.
चोपडा मतदारसंघात विकासगंगा
चोपडा विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असून, शहरी तसेच ग्रामीण भागात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. निमगव्हाण गावाच्या पुलापासून ते वैजापूरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण लवकरच पूर्ण होईल, याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील नागरिकांना उत्तम दळणवळणासाठी होईल.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व पाहणी दौरा
या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडाचे सभापती आणि संचालक शिवसैनिक उपस्थित होते. त्यांनी कामाच्या दर्जाची तपासणी केली व विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले.
हा रस्ता लवकरच पूर्ण होऊन नागरिकांना मजबूत आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम