नियुक्ती – रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्षपदी सौ. सोनाली ताई पाटील यांची नियुक्ती
उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्षपदी सौ. सोनाली ताई पाटील यांची वर्णी
उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
चोपडा (प्रतिनिधी)
देशासह राज्यात होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी ला सुरवात करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी दि. 14 फ्रेब्रुवारी रोजी महीला जिल्हा अध्यक्षपदी सौ सोनाली नारायण पाटील
यांची नियुक्ती पक्षाचे अध्यक्ष नामदार अजित दादा पवार यांच्या मुबंई येथील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते व महीला प्रदेश अध्यक्ष सौ रूपाली ताई चाकणकर
जिल्हा अध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे जिल्हा नेते विनोद भाऊ देशमुख सौ अश्विनी ताई देशमुख यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
सौ.सोनाली नारायण पाटील यांनी या अगोदर पंचायत समिती सभापती कुषी उत्पन्न बाजार समिती सदस्या आदी पदे भुषविले आहेत त्यांचा या निवडी बद्दल नामदार अनिल दादा पाटील जिल्हा बँके चे चेअरमन संजय पवार घनश्याम भाऊ अग्रवाल बाळासाहेब पाटील गिरीश भाऊ देशमुख तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
हे ही वाचा👇
चोपडा महाविद्यालयास कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत हॅट्रिक प्राप्त विजेत्यांचा झाला सत्कार
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम