निर्दयीपणे उंटाची वाहतूक करणारा ट्रक पकडला; नऊ उंटांची सुटका

बातमी शेअर करा...

निर्दयीपणे उंटाची वाहतूक करणारा ट्रक पकडला; नऊ उंटांची सुटका

सावदा पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – क्रूरपणे वाहतूक केल्या जात असलेल्या ३० उंटांची वेळेवर कारवाई करत सावदा पोलिसांनी सुटका केली. या उंटांना सध्या उपचारासाठी व सुरक्षित निवाऱ्यासाठी कुसुंबा येथील ‘अहिंसा तीर्थ – रतनलाल सी. बाफना गोशाळा’ येथे हलविण्यात आले आहे.

सावदा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. १६ मे रोजी पोलिसांनी दोन मोठ्या गाड्यांमधून कोंबून नेले जात असलेल्या उंटांची पहिली टप्प्यात सुटका केली. या कारवाईत १७ नर व ४ मादी अशा एकूण २१ उंटांची सुटका करण्यात आली. यातील १० ते १२ उंट गंभीर जखमी अवस्थेत आढळले. उंटांना दोरांनी बांधून अतिशय अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात होती.

यानंतर २४ मे रोजी पहाटे ३ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाला पुन्हा माहिती मिळाली. यावेळी एक ट्रक उंट घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ कारवाई करत ट्रक अडवण्यात आला. तपासणीदरम्यान उंटांच्या पायांना दोराने घट्ट बांधून त्यांची निर्दयी वाहतूक होत असल्याचे आढळले. यावेळी आणखी ९ उंटांची सुटका करण्यात आली.

संपूर्ण कारवाई वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९६० अंतर्गत करण्यात आली. आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम