निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या बुद्धिबळपटूंची तालुकास्तरीय स्पर्धेत अव्वल कामगिरी…!

बातमी शेअर करा...

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या बुद्धिबळपटूंची तालुकास्तरीय स्पर्धेत अव्वल कामगिरी…!

“बुद्धी, एकाग्रता आणि संयम” या तीन शक्तींचा संगम असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पातळीवर आपली चमकदार कामगिरी सादर करत पाचोरा शहराचा मान उंचावला आहे. शहरातील गो.से. हायस्कूल येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत शाळेच्या सर्वच खेळाडूंनी यश संपादन करून थेट जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक मारली.14 वर्षे मुलींच्या गटात कु. स्वरा अश्विन वाघ हिने विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले, तर कु. उत्कर्षा विकास सुर्यवंशी हिने द्वितीय क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले. मुलांच्या गटात युग सुनील पुसर्नानी चौथ्या स्थानी तर पियुष भूषण कुमावत पाचव्या स्थानी राहिले.

याचबरोबर 17 वर्षे मुलींच्या गटात कु. श्रेया विनोद महापुरे हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर कुमार शाश्वत राहुल संघवी याने मुलांच्या गटात चौथे स्थान मिळवले. या सर्वच विद्यार्थ्यांची जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री. वैभव हटकर व श्री. प्रवीण मोरे यांचे अथक परिश्रम व अनमोल मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम