
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा
संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमुकल्यांचा आनंदोत्सव
कजगाव ता. भडगाव ,प्रतिनिधी : तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतीक आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या सोबती असलेल्या बैलांच्या सन्मानाचा दिवस म्हणजे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते बैलांची पूजा करून सणाचे औचित्य साधण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवनातील नित्यसाथीदार असलेल्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत विद्यार्थ्यांना परंपरा आणि संस्कृतीची जाणीव व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सजवलेल्या पारंपरिक बैलगाडीत बसून आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या निरागस हसण्याने आणि खेळकर आनंदाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शेतकरी आणि बैल यांचे नाते मुलांच्या मनात रुजविण्याचा शाळेचा हा उपक्रम विशेष ठरला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. फरीदा भारमल, सौ. वर्षा पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम