निर्यात प्रचालन कार्यशाळेचे ११ जानेवारीला आयोजन

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

बातमी शेअर करा...

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

जळगावः जळगावातील जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने निर्यात प्रचालन शाळेचे येत्या शनिवार दि. ११ जानेवारी रोजी हॉटेल प्रेसिडेट कॉटेज, एमआयडीसी, जळगाव आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मिती लक्ष्य साध्य करण्यासाठी व निर्यात वाढीला प्रत्येक जिल्हयाला उत्तरदायी बनविण्यासाठी राज्याकडुन केंद्र उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

या कार्यशाळेत कृषी व प्रक्रिया अत्र उत्पादने निर्यात

विकास प्राधिकरण, परकीय व्यापार महासंचालनालयचे प्रतिनिधी हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

त्याअनुषंगाने जिल्हयातील सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था, संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच निर्यात संबंधी उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचानल समितीचे सदस्य व निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक सर्वांनी या कार्यशाळेस उपस्थित राहवे असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम