निळेगावात मरीमातेचा यात्रोत्सव उत्साहात; माजी आमदार राणा सानंदा यांनी घेतले दर्शन

बातमी शेअर करा...

निळेगावात मरीमातेचा यात्रोत्सव उत्साहात; माजी आमदार राणा सानंदा यांनी घेतले दर्शन

 

खामगाव: तालुक्यातील निळेगाव येथे श्रावण महिन्याच्या समाप्तीनंतर दरवर्षी आयोजित करण्यात येणारा मरीमाता पाईदेवी यात्रा महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी २३ ऑगस्ट रोजी मरीमातेचे दर्शन घेतले आणि ‘बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा’ असे साकडे घातले.

निळेगावातील मरीमातेचे मंदिर अतिशय प्राचीन असून, ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून या जागृत देवस्थानाची पंचक्रोशीत ओळख आहे. ‘ईडा-पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ या भावनेतून दरवर्षी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ यात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी आयोजकांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार केला.

संस्थानच्या वतीने यात्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. या महाप्रसादाचा निळेगावासह हिंगणा, कारेगाव, विहिगाव, राम नगर, पेंडका आणि पातोंडा या पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

यावेळी मनोज वानखडे, जयराम मुंडाले, रेवणसिंग चव्हाण, पुरुषोत्तम दहिभात, सुभाष चव्हाण, गणेश पाटील, विनोद पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम