निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा
आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा
रावेर
महिलांच्या विविध मागण्यांसाठी निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांसाठी शौचालये, घरकुल योजना, अवैध दारू विक्री यासह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
येथील छोरीया मार्केट येथून मोर्चाला भर पावसात निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्षा उज्ज्वला वाघ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाची सांगता तहसीलदार कार्यालयात झाली. निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये नमूद केले आहे की, रावेर तालुक्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिला तसेच नेत्रहीन, दिव्यांग व निराधार व्यक्तींना तात्काळ अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून धान्य पुरवठा करावा. त्यांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा. तालुक्यातील ऐनपुर गावात गेल्या महिन्यात अनेक ठिकाणी महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवर अनेक महापुरुषांचे फोटो असताना जातीयद्वेषाच्या भावनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर चिखल लावून बौद्ध समाजाच्या भावना भडकविण्याचा तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा घाणेरडा प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे तात्काळ त्या जातीयवाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, आदि मागण्याचे निवेदनाद्वारे देण्यात आले.
या वेळी जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा नंदाताई भावटे, तालुका उपाध्यक्षा ज्योत्सना संन्यास, सुलोचना भालेराव, सचिव कविता शिंदे, संपर्क प्रमुख अलका जाधव, सल्लागार चंबाबाई अवसरमल, रेखा तायडे, सुनंदा रायमळे, मनीषा बागुल, निकिता भावटे, मनीषा लोखंडे, मंदा साळवे, सदाशिव निकम, इकबाल तडवी, चंद्रकांत सोनवणे, विजय धनगर, नारायण सवर्णे, मोहन ससाणे, विलास तायडे, ॲड. प्रविण इंगळे आणि इतर शेकडो महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम