निवडणुकांमध्ये प्रसिद्धी माध्यमांची अत्यंत मोलाची भूमिका – आ. चंद्रकांत सोनवणे

चोपडा येथे आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रसिद्धी प्रमुखांची बैठक

बातमी शेअर करा...

निवडणुकांमध्ये प्रसिद्धी माध्यमांची अत्यंत मोलाची भूमिका – आ. चंद्रकांत सोनवणे

चोपडा येथे आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रसिद्धी प्रमुखांची बैठक

चोपडा I प्रतिनिधी

चोपडा विश्रामगृह येथे प्राआमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख यांची बैठक संपन्न झाले असून त्याप्रसंगी प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व प्रसिद्धीप्रमुख व सोशल मीडिया प्रमुख यांच्याशी तालुक्यातील 2024 निवडणुकीच्या संदर्भात व तालुक्यातील विकास कामांचा संदर्भात सविस्तर चर्चा केली .

त्याप्रसंगी त्यांनी सर्व प्रसिद्धी प्रमुखांना व सोशल मीडिया प्रमुख यांना 2024 निवडणुकीमध्ये आपली भूमिका अत्यंत मोलाची व महत्त्वाची ठरले असून आपल्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकास कामांचं विजन जनतेसमोर पोहोचले त्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेमध्ये खऱ्या काम करणाऱ्या नेतृत्वाला जनसामान्यातून व ग्रामीण भागातून व शहरी भागातून खरा प्रतिसाद मिळाला.

आजच्या या विजयाचे खरे शिल्पकार संपूर्ण तालुक्यातील जनता युवासेना व सोशल मीडिया प्रमुख प्रसिद्धी प्रमुख यांच्या माध्यमातून फेसबुक , इंस्टाग्राम , व्हाट्सअप च्या माध्यमातून जनतेमध्ये विकासाच्या खरा चेहरा जनतेसमोर गेला त्यामुळे आजच्या दिवशी सर्व प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया प्रमुख यांच्या खऱ्या अर्थानेआपल्या आपल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल मनापासून स्वागत व आपले आभार आजचे क्षणी आपल्या ऋणात राहू इच्छितो असे प्रतिपादन आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी केले त्याप्रसंगी तालुक्यातील सर्व सोशल मीडिया प्रमुख प्रसिद्धी प्रमुख उपस्थित होते.

तसेच त्याप्रसंगीनरेंद्र पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा संचालक गोपाल भाऊ पाटील , किरण भाऊ देवराज ,नामदेव भाऊ पाटील ,प्रताप पाटील ,प्रकाश दादा रजाळे , सुर्यभान पाटील , महेंद्र धनगर , कैलास बाविस्कर , गणेश पाटील , नंदू गवडी , प्रदिप बारी , प्रविण सांळूखें , आनू ठाकूर , राहुल पाटील लासूर , ऋषिकेश धनगर , अशोक पवार , नितिन पाटील , गुलाब कोळी , हरिष पवार , काझी साहेब , प्रतिभा माळी , सुनिल कोळी , समाधान कोळी , निजाम कुरेशी , आंबू कोळी , विनोद सोये , देवा चुंचाळे , गजानन कोळी , मंगल इंगळे , अरुण कोळी , मयुर धनगर व सर्व सोशल मीडिया प्रमुख व प्रसिद्धी प्रमुख व शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितित बैठक संपन्न झाली

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम