नीट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचा नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते सत्कार

बातमी शेअर करा...

नीट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचा नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते सत्कार

पाळधी: नीट परीक्षेत ५०० गुण मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या आदित्य जयवंत पाटील (रा. रेलकर, ता. धरणगाव) याचा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा पाळधी येथे पार पडला.

आदित्य पाटीलने नुकत्याच जाहीर झालेल्या नीट (NEET) परीक्षेत ५०० गुण मिळवत मोठे यश संपादन केले. त्याच्या या गुणवत्तेमुळे त्याला वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक (VPMC Nashik) येथे एमबीबीएसच्या पहिल्याच फेरीत प्रवेश मिळाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याच यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी नवलसिंगराजे पाटील यांनी आदित्यचा सत्कार केला आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुभाष पाटील, डॉ. जयवंत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम