नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

बातमी शेअर करा...

नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

जळगाव प्रतिनिधी ;- ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी आपला पदभार स्वीकारला . यावेळी त्यांचे विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी स्वागत केले . जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी अधिकाऱ्यांकडून प्रलंबित योजना,रखडलेले प्रकल्प यांचा आढावा जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला .

रोहन घुगे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अनुभवी अधिकारी असून, यापूर्वी ते जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले असून ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांच्या जागी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर व निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम