नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे निःशुल्क नेत्र तपासणी

शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

बातमी शेअर करा...

नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे निःशुल्क नेत्र तपासणी

शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

जळगाव : नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे सिंधी नववर्ष चेट्रीचंड व मराठी नववर्ष गुडीपाडवा निमित्त भव्य पंधरवाडा निःशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधी नववर्ष चेट्रीचंड आणि गुढीपाडवा नववर्षा निमित्त दि.२९ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान दररोज दुपारी ३ ते ६.३० वाजता निःशुल्क नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ. शिरीष पाटील, डॉ. हिरा जोशी, डॉ. तुषार बेंबटकर व डॉ. रेवती महाजन हे तपासणी करणार असून उपस्थित रुग्णांना त्यांच्याकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. शिबिरात ज्या रुग्णांकडे पिवळे कार्ड व केसरी कार्ड, उत्पन्नाचा दाखला असेल त्या रुग्णांना मोतीबिंदूसाठी निवडलेल्या रुग्णांवर फेको लेन्स टाकून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल, मोतीबिंदूच्या रुग्णणां पॅथॉलॉजि तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गुरुमुख जगवाणी, उपाध्यक्ष दिलीप मंघवाणी, सेक्रेटरी डॉ. मुलचंद उदासी व सर्व ट्रस्टींकडून करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम