नेत्रज्योती हॉस्पिटल येथे आज मोफत नेत्र तपासणी शिबीर

बातमी शेअर करा...

नेत्रज्योती हॉस्पिटल येथे आज मोफत नेत्र तपासणी शिबीर
जळगाव : संत बाबा गरीबदास बाबा यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त व नमो नेत्र संजीवनी अभियानामार्फत आज दि.२ रोजी दुपारी ३ ते ७ वाजेदरम्यान, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रुग्णांनी लाभघ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

. सदर शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ. हीरा जोशी, डॉ. शिरीष पाटील, डॉ. तुषार बोंबटकर यांनी दि.१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान, ८२३ रूग्णांची तपासणी केली असून त्यापैकी २४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली आहे. त्यांच्यावर मोफत इंडियन लेन्स शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जळगाव येथील सिंधी कॉलनीमधील नेत्रज्योती हॉस्पिटल येथे – आयोजित शिबिरात पिवळे रेशन कार्ड, केसरी कार्ड व उत्पन्नाचा दाखला असलेल्या रुग्णांवर मोफत इंडियन लेस टाकून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. निवड झालेल्या रुग्णांना पॅथॉलॉजि तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम