‘नेत्रम’ यंत्रणेचे अमळनेरमध्ये भव्य उद्घाटन

बातमी शेअर करा...

‘नेत्रम’ यंत्रणेचे अमळनेरमध्ये भव्य उद्घाटन

तिसऱ्या डोळ्याची नजर आता शहरावर; गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी आधुनिक पाऊल

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहराच्या सुरक्षेसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभली असून ‘नेत्रम’ ही अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आता एकाच नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असून, पोलीस स्टेशनमधून संपूर्ण शहरावर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर ठेवता येणार आहे.

या नव्या यंत्रणेचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “अमळनेरमधील गुन्हेगारी नियंत्रणासाठी ही यंत्रणा मैलाचा दगड ठरेल. पोलिसांना अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे, म्हणून ही सुविधा काळाची गरज होती.”

या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, डीवायएसपी विनायक कोते, तत्कालीन प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, “आमदार निधी व लोकसहभागातून उभारण्यात आलेली ही यंत्रणा पोलीस स्टेशनशी थेट जोडण्यात आली असून, तिची देखभाल आता पोलीस प्रशासन स्वतः करेल.” या संपूर्ण उपक्रमात तत्कालीन डीवायएसपी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे विशेष योगदान राहिले आहे.

या कार्यक्रमाला महिला दक्षता समितीच्या सुलोचना वाघ, माधुरी पाटील, प्रा. शीला पाटील, प्रमोदिनी पाटील, अलका गोसावी, भारती शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते के. डी. बापू, मुख्तार खाटीक, महेंद्र बोरसे, योगेश महाजन, राकेश पाटील, सुरेश पाटील, इम्रान खाटीक, सलीम टोपी, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशीव, आरिफ भाया, फिरोज मिस्तरी, नरेंद्र संदानशीव आदींची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम