
नेहरू चौक मित्रमंडळातर्फे भारत माता, श्रीराम पूजनासह शस्त्रपूजन उत्साहात
नेहरू चौक मित्रमंडळातर्फे भारत माता, श्रीराम पूजनासह शस्त्रपूजन उत्साहात
खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगावचा राजा नेहरू चौक बहुद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भारत माता, श्रीराम पूजन तसेच शस्त्रपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
प्रसंगी खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, राज्य पणन महासंघाचे रोहित निकम, माजी केशवस्मृती समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, विश्व हिंदू परिषदेचे ललित चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भारतमाता व भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर शस्त्रपूजन करून विजयादशमीच्या सर्वत्र शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांचेसह माजी नगरसेवक किशोर भोसले, गजानन मालपुरे, डॉ. गौरव महाजन, दीपक जोशी, माजी नगरसेवक अमित भाटिया, युवासेनेचे पियुष गांधी तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनीकुमार काळुंखे यांनी केले.
कार्यक्रमासाठी योगेश पाटील, अमोल भावसार, संदीप रडे, आकाश मंडोरा, सोनू भावसार, जगदीश जोशी आदींनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम